पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माहेर

 माहेर..... या शब्दात च किती आठवणी आहेत. गोड, हसऱ्या, लुटूपुटू ची भांडणं, मायेने ओथंबलेल्या, आईची कूस, बाबांचा पाठीवर मायेचा आणि धीराचा हात, आणि अशा कित्येक. हसायला काही कारण नाही लागत बहिणींच्या मध्ये गराड्यात असताना.     आमचे पप्पा जेव्हा कधी असं म्हणायचे ना की "ए आवाज हळू करा जरा" तर नेमका आवाज कसा काय वाढायचा काय माहिती ? पप्पांचा वचक होता हा आमच्यावर एकदम गप्प बसायला जमायचं नाही आणि मग हळूहळू कुजबुज. शेवटी ओरडा बसायचा च शक्यतो पण मोठ्याने नाही हं. आम्ही पाच जण होतो त्यामुळे बाहेर कुठे खेळायला जाण्याचा प्रश्न च नव्हता आणि हो पप्पांनी त्यावेळेला सुध्दा कॅरम, सापशिडी वगैरे असे घरीच खेळायचे खेळ आणून ठेवले होते. मोठी भावंडं लहानांना शिकवत आणि मग खेळ चालू. आणि महत्त्वाचं म्हणजे आईकडून सुध्दा सागरगोटे कसे खेळायचे हे पण शिकलो आम्ही. काय मज्जा यायची त्या खेळात आणि एकाग्रता सुध्दा लागायची त्याला जबरदस्त.